BCCI Announces Team India Squad for Asia Cup 2025 : 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप 2025साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियाचा संघ जाहीर केला.
यंदाचा आशिया कप टी-20 स्वरूपात रंगणार असून टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या कर्णधार शुभमन गिलला पण संघात स्थान मिळालेले आहे. तर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांना जागा मिळाली आहे.
आशिया कप 2025 साठी टीम इंडियाचा संघ :-
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षितराणा, रिंकू सिंग.
पहिल्यांदाच आशिया कपमध्ये 8 संघ होणार सहभागी :-
2025 चा आशिया कप 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान अबू धाबी आणि दुबई येथे खेळला जाईल. यावेळी आशिया कप टी-20 स्वरूपात असेल. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होत आहेत. आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच आठ संघांचा समावेश करण्यात आला आहे. या आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. आधी लीग स्टेज सामने खेळवले जातील, ज्यामध्ये प्रत्येक संघ 3 सामने खेळेल. त्यानंतर सुपर-4 फेरी होईल. यातील अव्वल संघांमध्ये 28 सप्टेंबर रोजी विजेतेपदाचा सामना खेळला जाईल.
आशिया कपमध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक :-
भारतीय संघाला आशिया कपच्या गट अ मध्ये पाकिस्तान, ओमान आणि युएईसह स्थान देण्यात आले आहे. तर गट ब मध्ये श्रीलंका, बांगलादेश, हाँगकाँग आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. भारतीय संघ आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये युएई विरुद्ध खेळेल. त्यानंतर त्यांचा पुढचा सामना 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये पाकिस्तान विरुद्ध होईल. भारतीय संघ आपला शेवटचा गट सामना 19 सप्टेंबर रोजी अबू धाबीमध्ये ओमान विरुद्ध खेळेल. आशिया कप दोन्ही गटातील टॉप-2 संघ सुपर-4 टप्प्यात पोहोचतील. त्यानंतर सुपर-4 टप्प्यातील टॉप 2 संघांमध्ये जेतेपदाचा सामना खेळवला जाईल.