CLOSE AD

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना : या योजनेअंतर्गत महिलांना ₹6,000 पर्यंत आर्थिक मदत मिळणार

PM Matrutva Vandana Yojana : मित्रांनो जर तुमच्या घरात गरोदर महिला असेल, तर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत शासकीय आर्थिक अनुदान मिळवण्याची संधी आहे. ही योजना गरोदर महिलांच्या पोषण आणि आरोग्य गरजांची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे.

योजनेची माहिती :-

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना १ जानेवारी २०१७ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. या योजनेची अंमलबजावणी महिला व बाल विकास मंत्रालय मार्फत केली जाते. योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरोदर व स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक सहाय्य देणे, जेणेकरून आई व बाळाचे आरोग्य चांगले राहील.

सरकारकडून मोफत भांडी संच मिळविण्यासाठी असा करा अर्ज

लाभ व रक्कम :-

या योजनेअंतर्गत पहिल्या गर्भधारणेसाठी आणि स्तनपान करणाऱ्या महिलेस एकूण ₹6,000 पर्यंत आर्थिक मदत मिळते. ₹5,000 ची मदत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेतून, ₹1,000 ची मदत इतर आरोग्य योजनेतून

हप्त्यांचे स्वरूप :-

1) पहिला हप्ता — गरोदर राहिल्यानंतर लगेच नोंदणी केल्यावर ₹1,000
2) दुसरा हप्ता — गरोदरपणाचे ६ महिने पूर्ण झाल्यावर आणि वैद्यकीय तपासणीनंतर ₹2,000
3) तिसरा हप्ता — बाळाचा जन्म झाल्यानंतर, जन्म नोंदणी आणि पहिले लसीकरण पूर्ण केल्यावर ₹2,000

कोण पात्र आहे?

ही योजना विशता ग्रामीण भागातील शेतकरी, अल्पभूधारक, मजूर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी उपयुक्त आहे. मात्र काही अटी पूर्ण करणाऱ्या शहरी महिलांनाही हा लाभ मिळू शकतो.

आवश्यक कागदपत्रे :-

आई व वडिलांचे आधार कार्ड (झेरॉक्स)
दोघांचे ओळखपत्र
बाळाचे जन्म प्रमाणपत्र
बँक पासबुकची प्रत
अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर यांच्याशी संपर्क साधा. ते तुम्हाला आवश्यक फॉर्म (तीन प्रकारचे) आणि मार्गदर्शन देतील. अधिकृत वेबसाईट — https://wcd.nic.in/

जर तुमच्या घरात गरोदर महिला असेल, तर ही योजना तुमच्यासाठी मोठी मदत ठरू शकते. योग्य कागदपत्रांसह लवकरात लवकर नोंदणी करून तुम्ही ही आर्थिक मदत मिळवू शकता.

Leave a Comment