CLOSE AD

मनरेगा योजनेखाली मिळणार मोफत सायकल ! असा करा ऑनलाईन अर्ज

Manrega Free Cycle Scheme : भारत सरकारने गरीब आणि गरजू मनरेगा मजुरांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव आहे मनरेगा फ्री सायकल योजना 2025. ही योजना विशेषता अशा मजुरांसाठी आहे, ज्यांच्याकडे मनरेगा जॉब कार्ड आहे आणि ज्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वाहतूक सुविधेचा अभाव आहे.

या योजनेत केंद्र सरकार जॉब कार्डधारक मजुरांना सायकल खरेदीसाठी ₹3000 ते ₹4000 पर्यंतचे आर्थिक अनुदान देणार आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे शक्य होईल आणि मजुरांचे आर्थिक नुकसान टळेल.

या योजनेचा उद्देश :-

मनरेगा फ्री सायकल योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की ज्यांच्याकडे सायकल खरेदीसाठी पैसे नाहीत, अशा गरीब, वंचित व सामाजिकदृष्ट्या दुर्बल गटातील मजुरांना ही सुविधा मिळावी. सायकलमुळे ते सहजपणे आणि वेळेत कामावर पोहोचू शकतील, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल, तसेच मजुरी कपात होणार नाही.

या योजनेचे फायदे :-

1) लाभार्थ्यांना सायकलसाठी थेट आर्थिक मदत मिळेल.
2) सायकलमुळे कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येईल.
3) वेळ आणि पैसे वाचतील.
4) मजुरी कपात होणार नाही.

पात्रता काय आहे?

अर्जदाराकडे वैध मनरेगा जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे.
अर्जदार गरिबी रेषेखालील असावा.
मागील 90 दिवसांत मनरेगामध्ये काम केलेला अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्जासाठी लागणारी कागदपत्रे :-

1) आधार कार्ड
2) मनरेगा जॉब कार्ड
3) रहिवासी प्रमाणपत्र
4) बँक खाते तपशील
5) जन्मतारीख प्रमाणपत्र
6) पासपोर्ट साइज फोटो
7) मोबाइल क्रमांक

सर्वप्रथम आपल्या राज्याच्या मनरेगा अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://nrega.nic.in
तेथे फ्री सायकल योजना या लिंकवर क्लिक करा.
नंतर अर्ज फॉर्म उघडून त्यामध्ये सर्व आवश्यक माहिती भरा.
मागितलेली कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा.

महत्त्वाची सूचना :-

अर्ज करताना कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती देऊ नये. तसे केल्यास तुमचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

मित्रांनो जर तुम्हाला या योजनेबाबत अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. योजना सुरू झाल्यानंतर अपडेट्स मिळवण्यासाठी नियमितपणे तपासणी करत राहा.

Leave a Comment