CLOSE AD

Kitchen jugad video: पावसाळ्यात पेपरवर कांदा ठेवताच कमाल झाली; मोठ्या समस्येवर उपाय, काय ते VIDEO मध्ये पाहाच

Kitchen jugad video: भारतात गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.गृहिणींनो तुम्ही कधी पेपरवर कांदा ठेवला आहे का? आता तुम्ही म्हणाल कांदा आणि पेपरवर कशाला ? मात्र थांबा पावसाळ्यात याचा मोठा फायदा आहे. तुम्हाला हा उपाय जितका विचित्र वाटतो आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त तो फायद्याचा आहे.

मात्र, नेमकी कमाल काय होते हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर पाहूयात यामुळे नेमकं काय होतं. आतापर्यंत कांदा हा आपण जेवणातच वापरला आहे.पावसाळ्याचे आगमन होताच वातावरणात थंडावा निर्माण होतो. उन्हापासून काहीसा दिलासा मिळतो. या दिवसात कांद्याची भजी खाण्याचा मोह कोणाला आवरत नाही. काहीजण वर्षभर पुरेल इतका कांदा एकदाच खरेदी करून साठवून ठेवतात. अशावेळी या साठवून ठेवलेल्या कांद्याची योग्य ती काळजी घेतली नाही तर, तो पावसाच्या ओलाव्याने खराब होतो.कांदा व्यवस्थित साठवून ठेवल्यास महिनाभर आरामात टिकतो. अन्यथा कांद्याला बुरशी लागते, ओलाव्यामुळे इतर कांदेही खराब होतात. यासाठीच या गृहिणीने हा हटके जुगाड सांगितला आहे.

ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देतंय 1.5 लाख ! असा करा अर्ज

5पावसाळ्यामुळे आपण एकत्र कांदे घेऊन ठेवतो मात्र कांदे साठवून ठेवल्यास त्याला पाणी सुटतं आणि ते खराब होतात. मात्र पेपर वापरल्यास हे कांदे अगदी ६ महिने खराब होणार नाही. या पेपरमुळे कांद्याचं संपूर्ण पाणी शोषून घेतलं जातं आणि कांदे सुके राहतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या महिलेने सगळे कांदे का पेपरवर पसरवले आहेत आणि नंतर पॅक केले आहेत. तुम्हीही पावसाळ्यात एकत्र घेतलेले कांदे अशाप्रकारे साठवून ठेऊ शकता. पावसाळ्यातील आर्द्र वातावरणामुळे कांद्याला कोंब फुटतात. यासाठी कांदा खरेदी केल्यानंतर कागदावर पसरवा. कागद जास्तीची आर्द्रता शोषून घेईल, ज्यामुळे कांद्याला कोंब फुटणार नाही, आणि दीर्घकाळ चांगले टिकतील.

Leave a Comment