CLOSE AD

ग्रासकटर खरेदीसाठी मिळणार अनुदान , असा करा लगेच अर्ज

Grass Cutter Anudan Yojana : मंडळी ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा परिषद ही योजना राबवते. या योजनेअंतर्गत ठराविक वस्तू किंवा साधनसामग्री खरेदीसाठी स्थानिक स्तरावर दर निश्चित केला जातो आणि पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात त्या रकमेपैकी 90% अनुदान स्वरूपात जमा केले जाते.

कोण अर्ज करू शकतो?

  1. •अर्जदार ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, नवबौद्ध, विमुक्त जाती आणि भटक्या जमातीपैकी असावा.
    •अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ₹70,000/- पेक्षा जास्त नसावे आणि तो दारिद्र्य रेषेखालील (BPL) असावा.
    •अर्जदार संबंधित गावाचा कायम रहिवासी असावा.
    •ग्रामसेवक यांनी अर्जदार योजनेस पात्र असल्याचे प्रमाणपत्र दिलेले असावे.
    •यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

अर्जासाठी लागणारी कागदपत्रे :-

1) जात प्रमाणपत्र (सक्षम अधिकाऱ्याने दिलेले)
2) उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांनी दिलेले)
3) रहिवासी असल्याचे स्वयंघोषणापत्र
4) ग्रामसेवक यांचे पात्रतेचे प्रमाणपत्र
5) योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र
6) रेशनकार्डची छायांकित प्रत
7) आधारकार्डची छायांकित प्रत
8) बँक पासबुकची (IFSC कोडसह) छायांकित प्रत
9) लहान कुटुंब असल्याचे स्वयंघोषणापत्र
10) ₹100/-च्या बॉण्ड पेपरवरील हमीपत्र (गटविकास अधिकाऱ्यांच्या समक्ष, प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर)

अर्ज कसा करावा?

सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज आपल्या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा तालुका पंचायत समितीकडे जमा करावा. अर्जाची तपासणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल.

अधिक माहिती :-

योजनेची सविस्तर माहिती आणि अर्जाचे नमुने पाहण्यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/schemes.php

Leave a Comment