CLOSE AD

घरकुल यादी : आपल्या गावाची घरकुल यादी पहा मोबाईल वर

Gharkul List On Mobile : मित्रांनो तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केला आहे का? आणि सतत या विचारात आहात का की, माझं नाव यादीमध्ये आलंय का? तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे! आता यादीत नाव आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी कुठेही चकरा मारायची गरज नाही. कारण सरकारने ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरच घरी बसून हे सगळं सहज तपासू शकता.

केवळ तुमचंच नव्हे, तर तुमच्या संपूर्ण गावातील कोणाकोणाची नावे घरकुल लाभार्थी म्हणून नोंदली गेली आहेत, याची माहितीही तुम्हाला काही मिनिटांत मिळू शकते.

यादीत तुम्हाला कोणती माहिती मिळते?

घरकुल यादी म्हणजे फक्त एक नावांची यादी नाही, तर त्यातून तुम्हाला अनेक महत्त्वाच्या गोष्टी कळतात.
जर तुमचं नाव यादीत असेल, तर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही, तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत, अजून किती मिळायचे आहेत, आणि गावातील इतर लाभार्थ्यांची स्थिती काय आहे या सगळ्याची माहिती एकाच ठिकाणी मिळते.

यात अर्जदाराचे पूर्ण नाव, अर्ज क्रमांक, लाभार्थीचा प्राधान्यक्रम (प्रवर्गानुसार) अशा अनेक बाबी स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात. यामुळे योजना कुठपर्यंत पोहोचली आहे, याचाही अंदाज येतो.

घरकुल यादी २०२५ मध्ये तुमचं नाव कसं तपासाल?

1) सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. या वेबसाइटचा पत्ता आहे – https://pmayg.nic.in

2) वेबसाइटवर गेल्यावर AwaasSoft हा पर्याय दिसेल. त्याखाली Reports.या विभागावर क्लिक करा.

3) यानंतर Beneficiary Details for Verification हा पर्याय निवडा.

4) पुढे एक फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुमचं जिल्हा, तालुका, गावाचं नाव आणि आर्थिक वर्ष (२०२४-२५) भरावं लागेल.

5) प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय निवडून खाली दिलेला कॅप्चा टाका आणि सबमिट करा.

एवढं केल्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण यादी उघडेल. यात तुमचं नाव आहे का, कोणत्या टप्प्यावर तुमचा अर्ज आहे, तुम्हाला किती रक्कम मिळाली आहे, हे सगळं तपासता येतं.

पूर्वी सरकारी कार्यालयात चकरा मारूनसुद्धा माहिती मिळेल की नाही, ही शंका असे. पण आता सगळं पारदर्शक झालं आहे. मोबाईलवर काही मिनिटांत माहिती हवी तशी मिळू शकते. त्यामुळे वेळ वाचतो आणि गैरसमज किंवा अपूर्ण माहितीमुळे होणाऱ्या अडचणी टाळता येतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी यादी वेळोवेळी तपासत राहणं महत्त्वाचं आहे. तुमचं नाव आल्यास पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण करा आणि लाभ मिळवण्यात उशीर होऊ देऊ नका.

Leave a Comment