Best Marathi Ukhane/ बेस्ट मराठी उखाणे / Ukhane Status In Marathi/ उखाणे स्टेटस मराठी.

 Best Marathi Ukhane/ बेस्ट मराठी उखाणे

Best Marathi Ukhane
Best marathi ukhane
Hii friends, How are you? मी आज तुमच्यासाठी बेस्ट मराठी उखाणे घेऊन आले आहे.


लग्न झालेल्या मुलीला किंवा मुलाला उखाणे घेवा लागतात.
त्यासाठी बेस्ट उखाणे पाठ असायला हवे. म्हणूनच मी खूप मजेशीर उखाणे आणले आहे.


उखाणे पोस्टमधे Best Marathi Ukhane, बेस्ट मराठी उखाणे,Ukhane Status In Marathi, उखाणे स्टेटस मराठी, इत्यादी आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल. तुम्हाला आवडल्यास नक्की Share करा.तुमच्या newly married couple friend लाही पाठवा.


🙏…धन्यवाद…🙏

Best Marathi Ukhane/ बेस्ट मराठी उखाणे

Best Marathi Ukhane
Best marathi ukhane

सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी. 


सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
….. ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.


साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
— नाव घ्यायला आग्रह कशाला


सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन
तुझ्यासाठी एखादा शर्ट घेताना माझ्यासाठीही दोन साड्या आणि चार ड्रेस घेईन


सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून 
***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून 


सकाळी सकाळी बागेत तोडत होते कळ्या
….रावांचे दात म्हणजे दुकानातल्या फळ्या


श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
…. ना आवडतो गरम गरम बटाटेवडा. 


शिडीवर शिडी बत्तीस शिडी ,
…राव ओढतात विडी अन मी लावते काडी .


विडाच्या पानात पावशेर कात ,
…रावांच्या कमरेत घातली गाढवाने लात .


वाकडी तिकडी बाबुळ,तिच्यावर बसलेला होला 
सखा पाटील मेला म्हणून तुका पाटील केला .


वड्यात वडा बटाटावडा, 
… मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा. 


लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास, अन …. च्या घशात अडकला घास


रेशमी सदर्‍याला प्लास्टीकचे बक्कल, …. ना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल


रुपयाची डबी त्यात आताराचा बोळा
..रावांचे बोलणे शंभर रुपये तोळा.


योगायोगाने योगा केला 
आणि मिळवले रोगावर नियंत्रण 
…. रावांशी ठरले आहे लग्न 
करते आग्रहाचे निमंत्रण


मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ……
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ……

आणि ……. रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून.. 


मोदींने सुरु केले स्वच्छता अभियान 
आणि आमच्या पदरात पडले …. चे ध्यान


मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,
— हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर 


मांडवाच्या दारी पुजला वारू,
कारभारी रोज घ्या दारू 
पण मला नका मारू .


भारताने यान सोडले नाव त्याचे “मंगळ”
___ रावांनी माझ्याशी लग्न केले 
नुसतीच करायला चंगळ


फळांचा राजा म्हणजेच हापूस आंबा 
फळांचा राजा म्हणजेच हापूस आंबा 
… राव रिझवतात संपूर्ण खंबा 
आणि म्हणतात मला 
तूच माझी उर्वशी …
तूच माझी रंभा


पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
…. आहेत आमचे फार नाजुक. 


पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ‘ मोरुची मावशी ‘ ,
…….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी. 


पावाबरोबर खाल्ले अमूल बटर, …. चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर


पहिली सोनी,दुसरी मनी,तिसरी जनी ,
सोडल्या तिघीजणी नी झालो ठकीचा धनी .


पप्पी नाही दिली म्हणुन,
बसले मी रुसून…..
पप्पी नाही दिली म्हणुन,
बसले मी रुसून…..
.
.
.
.
.
दगडुरावांचे नाव घेते,
नाकातला शेँबुड पुसून


नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
………तर आहेत माझ्या डाव्या खिशात 


नदी पलीकडे नदी
मधी पेरला लसून,
पतीदेव जाऊ नका रुसून 
आपण दोघे जाऊ रिक्षात बसून .


धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
….. च्या जीवावर करते मी मजा.


दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, …. चे नाव घेतो …. रावान् चा पठ्ठा

Ukhane Status In Marathi/ उखाणे स्टेटस मराठी

Ukhane Status In Marathi
Ukhane status in marathi
तेलाच्या दिव्याला तुपाची वात ,
..रावांशी केले लग्न ,आता आयुष्याची वाट .


तिच्याकडे मोबाईल नव्हता म्हणून त्याने दिला LAVA
तिच्याकडे मोबाईल नव्हता म्हणून त्याने दिला LAVA
नंतर ती त्याला फोन करून म्हणते, “धन्यवाद भावा”


तळ्यातल्या चिखलात लाल कमल उमलले, 
..राव खड्यात पडले ,त्यांना दुसर्याने काढले .


झेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु,
आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु 


जीवन आहे एक अनमोल ठेवा,
…… आणतात नेहमी सुकामेवा. 


जन्माची गाठ बांधली सर्वा समोर,
..नाव घेते  ,परत मारू नका बर .


चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा, 
मी आहे म्हैस तर तो आहे रेडा


चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ 


चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे


चांदीची फटफटी सोन्याची सीट ,
नवरा म्हणे बायकोला जाऊ आपण डबलसीट .


गोव्याहून आणले काजू
गनपतरावान्च्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु


गणपतीच्या देवळात शंकरची आरती ,
..गेले वरती नी मी राहले खाली .


गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, 
… माझी बायको आहे मोठी लुच्ची 


क्रिकेट मध्ये लागतो छक्का आणि चौका 
कुणी ला मिळतो मौका तर कुणाला मिळतो धोका 
मी… ह्यांची मनी माऊ 
…. राव आहेत बोका


कॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
…… आहेत फार निस्वार्थी 


कॉम्पुटर ल असते फ्लोपी डिस्क ,
हिच्याशी लग्न करून घेतली मोठी रिस्क .


कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र, …. नी माझ्या गळ्यात बांधले मंगळ्सूत्र
काश्मीरहून आणलाय रेशमी सुंदर रुमाल
…. बरोबर असले की हवाय कशाला हमाल
Marathi Ukhane Status
Marathi ukhane
कालच पिच्चर पहिला नाव त्याचे सायको ,
..रावांच नाम घेते …रावांची बायको .


एक होती चिऊ एक होती काऊ, …. चे नाव घेते , डोक नका खाऊ


ऍश्वर्या-अभिषेक यांची छान जमली जोडी,ईशा देओलने मारली यांच्याही पुढे उडी,
ईशा देओल उडी मारत पडल खड़्यात,ऍश-अभी अडकले नवरा-बायकोच्या नात्यात


उन्हाळ्यात अंगाला घाम येतो फार 
उन्हाळ्यात अंगाला घाम येतो फार 
… राव वापरतात CINTHOL साबण 
दुर्गंध होईल पसार 


इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
… घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!! 


इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव 
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!


आलिया भोगासी करावे सादर 
एक वर्ष नाही होत लग्नाला 
तर …रावांना होयचे आहे फादर


आजघर माजघर माजघराला नाही दार
गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार


अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड 
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्


अंगणात लावली फुलझाडे, कुंडीत लावली तुळस
…. चे नाव घ्यायला कसला आलाय आळस?


Facebook वर ओळख झाली 
Whatsapp वर प्रेम जुळले 
… राव आहेत खरच बिनकामी 
हे लग्न झाल्या नंतरच कळले


5 + 4 इज इक्वल टु नाइन
….. इज माइन 


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.


🙏…धन्यवाद…🙏

Leave a Comment