Bandhkaam Kaamgar Yojana : मंडळी महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश आहे की ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही अशा कामगारांना पक्के घर बांधण्यासाठी किंवा जमीन खरेदीसाठी आर्थिक मदत मिळावी. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.
मिळणारी आर्थिक मदत :-
या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी २,५०,००० रुपये पर्यंत अनुदान दिले जाते. तसेच, जर घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन नसल्यास, जमीन खरेदीसाठी स्वतंत्रपणे १,००,००० रुपये पर्यंतची आर्थिक मदत देखील दिली जाते. ही योजना विशेषतः अशा कामगारांसाठी उपयुक्त आहे, जे अनेक वर्षांपासून इतरांच्या घरावर काम करत आहेत, पण स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकलेले नाहीत.
पात्रता अटी :-
अर्जदाराचे नाव महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत असावे.
अर्जदाराने मागील १२ महिन्यांत किमान ९० दिवस बांधकाम काम केलेले असावे.
अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्षांदरम्यान असावे.
याआधी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
बांधकाम कामगारांना या योजनेद्वारे फक्त घरासाठी मदत मिळत नाही, तर अन्य फायदेही मिळतात
बांधकाम कामगारांना या योजनेद्वारे फक्त घरासाठी मदत मिळत नाही, तर अन्य फायदेही मिळतात.
- • विनामूल्य वैद्यकीय उपचार
• नियमित आरोग्य तपासणी
• गंभीर आजारांवर उपचार सुविधा
• अपघात विमा संरक्षण
• कुटुंबासाठी जीवन विमा व आर्थिक सुरक्षा
ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देतंय 1.5 लाख ! असा करा अर्ज
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1) बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
2) आधार कार्ड
3) निवासाचा पुरावा
4) कामाचा अनुभव दर्शवणारे प्रमाणपत्र
5) बँक खात्याची माहिती
6) जमीन किंवा घराशी संबंधित दस्तऐवज
अर्ज प्रक्रिया :-
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदारांना कुठेही प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया उपलब्ध आहे. तसेच तालुका आणि जिल्हा पातळीवर माहिती केंद्र स्थापन करण्यात आली आहेत, जिथे अर्ज प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले जाते.
ज्या बांधकाम कामगारांकडे स्वतःचे घर नाही, त्यांनी या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करून सरकारकडून मिळणाऱ्या ₹१ लाख अनुदानाचा लाभ घ्यावा आणि आपल्या घराचे स्वप्न साकार करावे.