Agricultural Implements : मित्रानो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध कृषी यांत्रिकीकरण योजना राबवल्या जातात. २०२५ पासून सुरू झालेली कृषी समृद्धी योजना ही त्यापैकी एक महत्त्वाची योजना असून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरपासून छोट्या साधनांपर्यंत ५०% पर्यंत अनुदान मिळण्याची संधी देते.
योजनांचे प्रकार :-
या उपक्रमात केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत अशा दोन प्रकारच्या योजना आहेत.
केंद्र पुरस्कृत योजना मध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM) यांचा समावेश होतो.
राज्य पुरस्कृत योजना मध्ये राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना आणि नवीन कृषी समृद्धी योजना यांचा समावेश आहे.
अनुदान किती मिळते?
ट्रॅक्टर खरेदीसाठी किंमतीच्या ५०% किंवा जास्तीत जास्त १ लाख २५ हजार रुपये अनुदान मिळते, जे कमी असेल ते प्रमाण लागू होते. मात्र, हा लाभ फक्त एकदाच मिळतो आणि ट्रॅक्टरचे आरसी बुक कुटुंबातील कोणाच्या नावावर असणे आवश्यक आहे.
इतर कृषी यंत्रांसाठी जसे की हार्वेस्टर, रोटावेटर, नांगरणी यंत्र, फवारणी यंत्र, छाटणी साधने – अनुसूचित जाती-जमाती व अल्पभूधारकांना ५०% पर्यंत तर इतर शेतकऱ्यांना ४०% पर्यंत अनुदान मिळते.
कोण पात्र आहेत?
या योजनेसाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट किंवा कृषी संस्था पात्र आहेत. ट्रॅक्टर खरेदीसाठी नावावर आरसी बुक असणे आवश्यक आहे. साधन ट्रॅक्टर चालित, मनुष्य चालित, बैल चालित किंवा स्वयंचलित असू शकते. एकाच साधनासाठी १० वर्षांपर्यंत पुन्हा अर्ज करता येणार नाही. एकूण अनुदानाची मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया :-
अर्ज महाडीबीटी पोर्टलवरून करावा लागतो https://mahadbt.maharashtra.gov.in. सर्वप्रथम Farmer ID वापरून लॉगिन करावे, कृषी यांत्रिकीकरण योजना निवडावी, हवे असलेले साधन निवडून आवश्यक माहिती भरावी आणि कागदपत्रे अपलोड करावी. पूर्वसमतीनंतर खरेदीची प्रक्रिया पूर्ण करावी.
लागणारी कागदपत्रे :-
अर्ज करताना आधार कार्ड, फार्मर ID, बँक खात्याचा तपशील (DBT सक्षम), ट्रॅक्टरसाठी RC बुक, साधनाचे कोटेशन, फेस रिपोर्ट आणि खरेदी बिल आवश्यक आहे.
कोणत्या साधनांवर मिळतो लाभ?
मनुष्य चालित साधनांमध्ये फवारणी यंत्र (बॅटरी किंवा सोलर), छाटणी उपकरण आणि कोळपणी साधने येतात. बैल चालित साधनांमध्ये नांगरणी यंत्र व बी पेरणी यंत्राचा समावेश होतो. तर ट्रॅक्टर चालित साधनांमध्ये रोटावेटर, हार्वेस्टर, फवारणी यंत्र आणि कडबाकटी यांचा समावेश आहे.
अर्ज करताना लक्षात ठेवाव्या गोष्टी :-
तुमची प्रोफाइल पोर्टलवर पूर्णपणे अपडेट असावी, बँक खाते DBT सक्षम असावे, जातीचा व अपंगत्वाचा तपशील नोंदवलेला असावा आणि ट्रॅक्टरसाठी आरसी बुक अनिवार्य आहे. अर्ज केवळ शासकीय पोर्टलवरूनच करावा, बाह्य एजंट किंवा इतर लिंक्स वापरू नयेत.
मदतीसाठी संपर्क :-
योजनेबाबत अधिक माहिती किंवा मदत हवी असल्यास तालुका किंवा जिल्हा कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच महाडीबीटी हेल्पलाइन १८००-१२०-८०४० वरही मार्गदर्शन मिळू शकते.
कृषी यंत्र योजना ही शेतकऱ्यांसाठी उत्पादनक्षमता वाढवणारी आणि खर्च कमी करणारी एक महत्त्वाची योजना आहे. वेळेत अर्ज करून आणि सर्व अटी पूर्ण करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.