Pan Card News : नमस्कार मित्रांनो जर तुम्ही पॅन कार्ड ला आधार कार्ड सोबत लिंकिंग केले नसेल तर एक अंतिम संधी सरकार कडून दिली जात आहे जर तुम्ही निष्क्रिय पॅन वापरले तर तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते, चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
पॅन आणि आधार का झाले आवश्यक :-
आजच्या काळात पॅन कार्ड आणि आधार कार्डशिवाय कोणतेही महत्त्वाचे आर्थिक काम पूर्ण होणे कठीण झाले आहे. बँक खाते उघडणे, कर्जासाठी अर्ज करणे, आयकर रिटर्न दाखल करणे किंवा गुंतवणूक करणे या सर्वांसाठी पॅन आणि आधार हे आवश्यक दस्तऐवज आहेत.
सरकारने का केले लिंकिंग बंधनकारक :-
सरकारने आर्थिक व्यवहार सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. तरीही अनेक लोकांनी आपले पॅन व आधार लिंक केलेले नाही, ज्यामुळे त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले आहे. अशा निष्क्रिय पॅनचा वापर केल्यास आयकर कायद्याच्या कलम २७२ब अंतर्गत कारवाई होऊ शकते.
निष्क्रिय पॅन वापरल्यास काय होईल :-
आर्थिक व्यवहारांमध्ये निष्क्रिय पॅन वापरणाऱ्यांवर कठोर कारवाईची शक्यता आहे. आयकर कायदा १९६१ च्या कलम २७२ब नुसार, एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असणे किंवा निष्क्रिय पॅन वापरणे आढळल्यास दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.
पॅन कार्ड म्हणजे काय :-
पॅन हा आयकर विभागाकडून जारी केलेला अद्वितीय १० अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक आहे, जो प्रत्येक व्यक्ती, कंपनी किंवा संस्थेसाठी वेगळा असतो. तो आर्थिक व्यवहारांसाठी ओळखीचा पुरावा म्हणून वापरला जातो आणि केवळ एका व्यक्तीकडे एकच पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
पॅन-आधार लिंक कसे करावे :-
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे सोपे आहे. आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपले पॅन आणि आधार तपशील भरून View Link Aadhar Status हा पर्याय निवडा. काही क्षणांत तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल.
लिंकिंग का महत्त्वाचे आहे :-
सरकारने स्पष्ट केले आहे की पॅन आणि आधार कार्ड लिंक न केल्यास केवळ दंडाचीच कारवाई होणार नाही तर अनेक महत्त्वाची आर्थिक कामे अडकू शकतात. त्यामुळे विलंब न करता पॅन-आधार लिंक करणे अत्यावश्यक आहे.