Beauty Parlour Subsidy : मित्रानो ग्रामीण भागातील अनेक महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहतात. पण भांडवलाच्या अभावामुळे हे स्वप्न अनेकदा अपूर्णच राहते. अशाच महिलांसाठी महाराष्ट्र शासनाने ब्युटी पार्लर अनुदान योजना 2025 सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना ५०,००० रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. त्यातील ८५% म्हणजे ४२,५०० रुपये थेट शासनाकडून अनुदान स्वरूपात दिले जातात, तर उर्वरित ७,५०० रुपये अर्जदाराने स्वतःच्या खिशातून भरायचे असतात. ब्युटी पार्लर हा कमी गुंतवणुकीत चांगला नफा देणारा व्यवसाय असल्याने ही योजना अनेक महिलांसाठी सोन्याची संधी ठरू शकते.
योजनेचा उद्देश :-
ही योजना विशेषता अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. उद्देश एकच महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देणे आणि त्यांच्या गावातच रोजगार निर्माण करणे. ब्युटी पार्लर हा केवळ व्यवसाय नाही, तर आत्मविश्वास आणि ग्राहकांशी नातं बांधण्याचा मार्ग आहे.
या योजनेतून मिळणारे फायदे :-
—५०,००० रुपयांचे थेट आर्थिक सहाय्य, त्यातील ८५% शासनाकडून अनुदान, आपल्या गावात किंवा शहरात व्यवसाय सुरू करण्याची संधी, मिळालेल्या अनुदानातून ब्युटी पार्लर साहित्य खरेदी करण्याची मुभा, महिला-केंद्रित स्वयंरोजगाराचा मार्ग
कोण अर्ज करू शकते?
- 1) अर्जदार महिला अनुसूचित जमातीची असावी
2) महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक
3) वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे
4) यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा
5) तहसीलदारांकडून प्रमाणित वार्षिक उत्पन्नाचा दाखला आवश्यक
अर्जासाठी लागणारी कागदपत्रे :-
—आधार कार्ड, पॅन कार्ड आणि BPL कार्ड क्रमांक, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, शिक्षण प्रमाणपत्र किंवा व्यवसायाचा अनुभव (असल्यास), बँक पासबुकची प्रत (IFSC कोडसहित), स्थावर मालमत्तेची माहिती, शेतजमिनीचा तपशील, घराचा मिळकत क्रमांक, अनुसूचित जमातीचा दाखला आणि रहिवासी दाखला, ७/१२ उतारा किंवा वनहक्क पट्टा प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट साईज फोटो, इतर पूरक कागदपत्रे PDF स्वरूपात
अर्ज कसा करायचा?
1) https://nbtribal.in या संकेतस्थळावर जा.
2) अर्जदाराचे लॉगिन हा पर्याय निवडा.
3) युजर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा.
4) ऑनलाइन फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा.
5) लागणारी सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करा.
6) अर्ज सबमिट करून प्रिंट किंवा स्क्रीनशॉट जतन करा.
7) योजनेचे नाव निवडताना अनुसूचित जमातींच्या महिलांना ब्युटी पार्लरचे दुकान सुरू करण्यासाठी ८५% अनुदान हा पर्याय निवडा.
ब्युटी पार्लर अनुदान योजना 2025 ही फक्त एक योजना नाही, तर ग्रामीण महिलांसाठी स्वप्नांना पंख देणारी संधी आहे. थोडी मेहनत आणि योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय केवळ आर्थिक स्थैर्यच नाही, तर आत्मविश्वास आणि समाजात नवा दर्जाही देऊ शकतो.