मराठी म्हणी/ Marathi Mhani

Marathi Mhani/ मराठी म्हणी

Marathi Mhani
Marathi mhani

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी मराठी म्हणी घेऊन आले आहे.



म्हणीचा उपयोग खूप दिवसांपासून केला जातो.आपले पूर्वजही म्हणींचा वापर रोजच्या जीवनात करायचे.आणि आज आपणही म्हणींचा वापर करतो.कोणाचं काही चुकल किंवा,कोणाला टोमणा मारायचा असेल तर म्हणींचा वापर केला जातो.आत्ताच्या मुलांच्या म्हणी व त्यांचे अर्थ लक्षात रहावे म्हणून परीक्षेत पेपरमधे म्हणी व त्यांचे अर्थ विचारले जातात.



म्हणींचा पोस्टमधे मराठी म्हणी,Marathi Mhani,Marathi Mhani Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला हे collection आवडल्यास नक्की Share करा.



🙏...धन्यवाद…🙏

Marathi Mhani/ मराठी म्हणी

Marathi mhani
Marathi mhani

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.

दैव देतं अऩ कर्म नेतं.

देव तारी त्याला कोण मारी.

देणे ना घेणे दोन्ही सांजचे येणे.

दुष्काळात तेरावा महिना.

दांत आहे तर चणे नाहीत, चणे आहेत तर दांत नाहीत.

दगडापेक्षा विट म‌ऊ.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार.

तेल गेले, तुप गेले, हाती आले धोपाटणे.

तीन तिघडा काम बिघाडा.

तळे राखी तो पाणी चाखी.

झगा मगा माझ्याकडे बघा.

ज्याचं करावं भलं तोच म्हणतो आपलचं खर.

ज्या गावाला जायचे नाही त्य गावचा रस्ता विचारू नये.

जेथे पिकतं तिथे विकतं नाही.

जुनं ते सोनं नवं ते हवं.

जलात राहून माशाशी वैर कशाला?

जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठिण.

जनाची नाही तरी मनाची तरी जरा.

Marathi mhani status
Marathi mhani status

चोराच्या वाटा चोरालाच माहीत.

चोराच्या उलट्या बोंबा.

चोर सोडून संन्याशाला सुळी.

चोर तो चोर वर शिरजोर.

चिता मेलेल्या माणसाला जाळते, पण चिंता जिवंत माणसाला जाळते.

चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.

चार आण्याची कोंबडी अऩ बाराण्याचा मसाला.

चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही.

घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी.

घर फिरले की वासेही फिरतात.

गोगल गाय पोटात पाय.

गाढवाला गुळाची चवं काय?

गाढवा समोर वाचली गिता, कालचा गोंधळ बरा होता.

गाढवं मेलं ऒझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने. 

गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.

गरज सरो अऩ वैद्य मरो.

गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे.

खा‌ईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.

खाली मुंडी, पाताळ धुंडी.

खायचे दांत वेगळे, दाखवायचे वेगळे.

खाण तशी माती.

कोल्ह्यास द्राक्षे आंबट.

Marathi mhani
Marathi mhani

केल्याने होत आहे आधी केले ची पाहिजे.

कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.

कुणी वंदा, कुणी निंदा, माझा स्वहिताचा धंदा.

कुणाचा कुणाला पायपूस नाही.

कुठे तरी पाल चुकचुकतेय.

कावळ्याने कितीही अंग घासले तरी बगळा होत नाही.

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.

कावळा बसायला आणि फांदी तुटायला.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

कामापुरता मामा अऩ ताकापुरती आजी.

काम ना धाम अनं उघड्या अंगाला घाम.

काखेत कळसा अऩ गावाला वळसा.

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की share करा.तुम्ही तुमच्या social media accounts

वरही share करू शकता.



🙏…धन्यवाद…🙏

Leave a Comment