मराठी चारोळ्या/Best Marathi Charoli / Marathi Charolya.

 Best Marathi Charoli / बेस्ट मराठी चारोळ्या.

Marathi Charoli
Best marathi charoli

Hii friends,How are you? आज मी तुमच्यासाठी  Best Marathi Charoli घेऊन आले आहे.

प्रेम ही खूप चांगली feeling आहे. सतत आपल्या आवडत्या व्यक्तीचा विचार मनात चालू असतो.

आजच्या आपल्या मराठी चारोळ्या पोस्ट मधे Best Marathi Charoli,Marathi Charolya, Charoli Status In Marathi,Love Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे collection नक्की आवडेल. 

तुम्ही तुमच्या partner लाही पाठवू शकता.तसेच तुम्ही तुमच्या whatsapp status लाही ठेवा. मित्रांनाही Share करा.


🙏…धन्यवाद…🙏

Best Marathi Charoli/ बेस्ट मराठी चारोळ्या

Best Marathi Charoli
Marathi charoli

ह्रदयावर डोकं ठेव ,

बघ काय ऐकू येतं का…

ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्यात,

नाव तुझंच येतं का ?…

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

ह्रदयातील माझी जागा तुझ्या

येण्याने भरुन गेली…

तू गेल्यावर ती जागा तुझ्या

आठवणींत बूडून राहीली…

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

ह्रदयात येऊन बघ अजून

त्याला तुझीच गरज आहे…

तू गेल्यानंतरही त्यात

तुलाच प्रेमाने जपत आहे…

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

ह्रदयात एक जखम

आजही सळत होती…

आठवण तुझी, का?

मलाच छळत होती…

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

ह्रदय ही हल्ली, माझं तुझ्याशिवाय

काहीच मागत नाही…

तू सोबत असताना माझे ह्रदय,

माझे राहत नाही…

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

ह्रदय माझं हल्ली थोडं

वेड्यासारखं वागतं

तू ह्रदयात असतेस तरीही

बाहेर शोधायला लागतं 

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

ह्रदय फ़क्त तडफडतय ना ,

फुटले तर नाही ?

आयुष्याचे रंग ,

विटले तर नाही ?

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

ह्या पडणाऱ्या पावसात 

तुझ्या सोबत भिजु वाटतं..

पण तु आजारी पडशील म्हणूनच 

तुझ्या सोबत भिजायला मन माझं घाबरतय…

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

होकारांला शब्दांना महत्व नसते

दाटल्या भावानांना काही बंध नसते,

डोळेच सांगून जातात हाल हृदयाचे,

प्रेमात शब्दांची गरज नसते..

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

हे सांगू की ते सांगू करत

तेच तर सांगायाच राहीले

तिचे ते मुके शब्द मी

माझ्या मुक्या डोळ्यांनीच पाहिले

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

हे प्रेमाचं असचं असत..

थोडसं अवघड अन थोडं सोप असत..

पण एकदा जमायला लागलं की

ते आपोआपच घडत असतं..

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

हे आपला अबोल प्रेम 

असाच सुंदर असु दे

पण स्वप्नात का होईना

 एकदा तरी खुलू दे

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
हृदयात नेहमीच तुझ्यासाठी
थोडी जागा जपून ठेवतो…
कधीतरी येशील म्हणून त्या
जागेवर फुले पांघरूण ठेवतो…
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात 
तुझीच आठवण ताजी आहे…
शरीराने कितीही दूर गेलीस तरी,
मनाने अजूनही तू माझीच आहे…
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

हृदयाचे जग रिकामे आहे … 

जेव्हा पासून तू गेली आहेस…

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

हृदय काहितरी सांगतय तुला,

वाट पाहते आहेस तु कोणाची तरी……

का लपवतेस भावना तुझ्या मनात,

हो कोणाच्यातरी मनाची रानी…

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

Sad charoli image marathi
Sad charoli image marathi

ही भेटच नाही तर फक्त

एक माझी आठवण आहे

हे फक्त शब्दच नव्हे, यात

विचारांची साठवण आहे

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

ही कवितांची वही उघडा

पण जराशी जपून

नाहीतर चाहूल तुमची लागताच

शब्द बसतील लपून..

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

हिवाळ्यातील ही गुलाबी हवा

सोबत तू ही असावी..

घट्ट मारलेल्या मिठीत

शिरण्यास थंडीसही जागा नसावी..

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

हातात हात घेशील जेव्हा

भिती तुला कशाचीच नसेल…

अंधारातला काजवाही तेव्हा

सुर्यापेक्षा प्रखर असेल…

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

हातात हात घेता तुझा,

हृदयात कंप उठले..

हळूच मन माझे 

तुझ्यात गुरफटले….

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

हातात पेन घेतले आणि तुझ्यावर

काही लिहूयात म्हंटले….

चारोळीत लिहायला घेतले पण,

चार पानांतही कमी पडले….

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

हातात धरलेलं पाखरु अवचित सुटावं..

तसा जीव सुटतो देहातून….

कोणी त्या क्षणांची वाट बघतं..

कोणी धास्ताऊन जात मनातून…

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
हाताच्या ओंजळीतं खूप सारी
स्वप्ने रेखाटलेली आहेतं,
ती तुझ्या आणि माझ्यासाठी
नव्याने साकारलेली आहेत 
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

हात हजार मिळतात

अश्रू पुसण्यासाठी

डोळे दोनही मिळत नाहीत

सोबत रडण्यासाठी

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

हल्लीचा पाऊस मला वेडे

बघ पहिल्यासारखा वाटत नाही,

तु नसतेस ना सोबतीला माझ्या

म्हणूनच मनात तो साठत नाही

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

Marathi Charoli
Marathi charoli image

हलकेच येऊन कानात ,

तुला सांगायचंय काही…

मिठीत तुझ्या येऊन ,

थोडं रहायचंय राणी… 

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

स्वप्नांच्या मागे धावु नकोस,

स्वप्न सगळीच पूर्ण होत नाहीत…

उरतात ते फक्त उसासे,

अश्रु पण खाली ओघळत नाहीत….

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

स्वतःचं मन मारून

तुला बरं जगता आलं

आपल्यांशी देखील तुला

परक्यासारखं वागता आलं

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

स्पर्श तो तुझा

हवा हवासा

श्वासातून भासे

नवा नावासा….

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

स्पर्श तुझा व्हावा,

अन देह हा माझा लाजून चूर व्हावा…

हक्काने मिठीत तू घ्यावेस,

जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्याचा असावा…

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

सोबत नसतेस तरी ,

तुझा स्पर्श जाणवतो…

का? आजही हा जीव,

तुझ्यासाठी तळमळतो…

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

सोन्यासारखा संसार करशील

दिल्या घरी नांदताना

सांग माझी आठवण येइल का तुला

ती बागेतली रातराणी फ़ुलताना

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

सोडून तू गेलीस असं ,

काय माझं चुकलं होतं …

तुला हवं ते सारंच ,

आजवर तर मी दिलं होतं …

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

सुख दुखाचा विचार करताना

मी तुलाच समोर पाहिले

माझे संपूर्ण जीवनच

तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

सावली नकोस शोधु ,

ती आपल्या जवळच असते,

नजर फक्त मागे वळव,

डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

सारखचं वाटतं पाऊस पडावा,

तू सोबत असताना…

ओढणी धरावीस डोक्यावर 

पावसाचा थेंब पडताना….

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

सांग हळूच कानात ,

येऊन सारे …

तुझ्याही मनात ,

काहीतरी आहे ..

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

सहवासाच्या वेलीवर प्रीतीचे फुल

केव्हा उमलल कळलच नाही,

तु माझी, तु माझी म्हणताना,

मी तुझा केव्हा झालो कळलचं नाही..

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

सर्वांपासून दूर एक 

वेगळीच दुनिया आहे… 

जिथे फ़क्त तू आणि मी आहे…

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

सरलेल्या आयुष्यात ही

थोड्या आठवणी आहेत,

सुखाचे क्षण जरी विसरले

त्या आठवणी सोबतीला आहेत

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

सखे तू अशी नेहमी

वेड लावून का जातेस

डोळे मिटले कि तू

स्वप्नात येऊन जातेस..

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

संगीत जुनचं आहे

सूर नव्याने जुळतायत…

मनही काहिसं जुनचं

तेही नवी तार छेडतायत…

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

श्वासात फक्त मी नाही माझा 

प्राण तुझ्यात जडला आहे,

शरीरं असल माझ, मनाने

तुझ्या रुपात हरवलो आहे 

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

शांत संध्याकाळी समुद्रकिनारी 

तुझी वाट बघत मी बसलो होतो

दूर देशावरून येणाऱ्या लाटेशी 

एकटाच बोलत बसलो होतो…

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

शब्दाविना कळावं

मागितल्याशिवाय मिळावं

धाग्याविना जुळावं 

स्पर्शावाचून ओळखावं

तुझं माझं प्रेम..

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

शब्द जेंव्हा मुके होतात

आठवण असते मनी तुझी,

बोलता ही येत नाही मग 

अबोल होते वाणी माझी 

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

वेड्या या ह्रदयाला तूच

आता सांभाळू शकते…

माझ्यापेक्षा तूच आता

त्याला चांगलं समजू शकते..

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

वेड्या क्षणी भास् होतो

तू जवळ असल्याचा

डोळे उगीच दावा करतात

तू स्पष्ट दिसल्याचा

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

वाटेकडे तुझ्या जायला,

निघतो मी जेव्हा कधी…

जाऊन बसतो त्या तिथे ,

तू माझी असायचीस कधी…

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

वाटल नव्हतं कधी

असही कधी घडेल…..

एक गोड सोनपरी 

माझ्या प्रेमात पडेल….

✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.


🙏…धन्यवाद…🙏

Leave a Comment