Life Status In Marathi/ आयुष्य स्टेटस मराठी
Life status in marathi |
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी आयुष्यावर पोस्ट घेऊन आले आहे.
प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवगळे असत. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीनाकाही अडचणी असतात. पण आयुष्य हे मात्र नीट आनंदाने जगल पाहिजे.
आयुष्य या पोस्टमधे आयुष्य स्टेटस मराठी,Life Status In Marathi,Life Quotes In Marathi,Life Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला हे collection आवडल्यास नक्की Share करा.
🙏...धन्यवाद...🙏
Life Status In Marathi/ आयुष्य स्टेटस मराठी
Life status in marathi |
विश्वास जपनं खुप महत्त्वाच असत…कारण एकदा दिलेला शब्द खाली पडला की ,
sorry या शब्दाला काहीच अर्थ राहत नाही…
_____________________________________
विज्ञानाखेरीज अपल्याला भविष्य
नाही पण त्याला
आध्यात्माचा लगाम हवा.
_____________________________________
विचार न करता शिकणे हे निरुपयोगी
असते तर न शिकता विचार करणे हे
धोकादायक असते.
_____________________________________
विचार कुठुनही घ्यावेत पण
घेताना ते पारखून घ्यावेत.
_____________________________________
![]() |
Life status in marathi |
वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो
तरी वळणावरून वळवाच लागतं.
_____________________________________
वयानं मोठ्या झालेल्या माणसाचं सर्वात मोठं दु:ख हेच आहे की त्याला लहानासारखं मोकळेपणानं मनसोक्त रडता येत नाही !
_____________________________________
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच
गोष्ट कायमची आपली नसते.
_____________________________________
रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय
– मौन .
_____________________________________
या जन्मावर,
या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
_____________________________________
या जगात एकच जात आहे- माणूस !
आणि धर्मही एकच- माणूसकी!
_____________________________________
यशस्वी होणं हा निव्वळ नशिबाचा खेळ आहे… विश्वास बसत नसेल तर
एखाद्या नापास पोराला विचारा…
_____________________________________
मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होउन जगावं लागतं …
सुख मिळवन्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं .
_____________________________________
मेल्यानंतर काय होतं, हे मेल्याशिवय कळत नाही, पण जगून काय केल याच
उत्तर बरेचदा मेल्या नंतरही मिळत नाही..
_____________________________________
मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा.
गमावलेल्या सुखासाठी हळहळण्यात
मन गुंतवणं व्यर्थ होय.
_____________________________________
मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू
अधिक
दुःखदायक असतो.
_____________________________________
Life Quotes In Marathi/ आयुष्य कोटस् मराठी
Life quotes in marathi |
माहीती नाहि का पण,
जिवनाचा तेढा सुटत नाही
शहाण्या माणसांच शहाणपण
वेडा कधी लुटत नाही
_____________________________________
मानवाच्या शरीरातच त्याच्या कल्याणाचा
खजिना भरलेला आहे आणि तो शोधण्याचे सामर्थ्य देखील परमेश्वराने
मानवाला दिलेले आहे…
_____________________________________
माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी,
प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
_____________________________________
माणसाच्या आयुष्याचे रहस्य केवळ
जगण्यात नसून
कशासाठीतरी जगण्यात आहे…
_____________________________________
माणसाचा सगळ्यात मोठा
सद्गुण म्हणजे
त्याची माणुसकी.
_____________________________________
माणसाचं मन मोठं विचित्र असतं. प्रेम आणि अहंकार, आशा आणि भीती यांचा पाठशिवणीचा खेळ तिथं अष्टौप्रहर चालतो. तो खेळ कधी संपत नाही आणि माणसाचं दु:ख कधी कमी होत नाही.
_____________________________________
माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की
त्याला सुखाची चव येते…
_____________________________________
माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ
येतात आणि
सोयीनुसार दुर जातात…
_____________________________________
माझे ते खरे म्हणण्यापेक्षा खरे तेच
माझे म्हणा.
_____________________________________
मला हरण्याची कधीच भीती नाही. कारण मी जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ते शून्यातून करतोय. आपण एक दिवस चमकणारच हे निश्चित आहे.
_____________________________________
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत…
वित भर सुखासाठी हातभर दु:खांशी compromise करणं…
_____________________________________
मरण हे अपरिहार्य आहे
त्याला भिऊ नका
_____________________________________
मरण जवळ आलं म्हणून जगायचं
कुणी थांबतं का !
_____________________________________
मनुष्याची मुद्रा म्हणजे जीवनग्रंथ.
डोळे म्हणजे तर जीवनातील
अनुभवाने भरलेले डोह
_____________________________________
मनातले सारे काही सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस असावा लागतो . .
एवढं असूनही चालत नाही त्या माणसालाही मन असावं लागतं….
_____________________________________
मनातला कोणताही विचार
कागदावर सहज येत नाही.
तो आधी जगण्यात असावा लागतो.
_____________________________________
मनात प्रश्नाचे वावटळ जेंव्हा थैमान घालायला लागत तेंव्हा आयुश्याच गलबत दिशाहीन फिरायला लागत …
_____________________________________
मनाच्या जखमेला सहानुभूतिशिवाय औषध नाही. अश्रूंनीच हृदये कळतात
आणि अश्रूंनीच हृदये मिळतात.
_____________________________________
भोग आहेत नशीबाचे भोगावे तर लागतीलच,
आज पेरलेली रोपटी
कालांतराने उगवतीलच
_____________________________________
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो..
_____________________________________
Life Message In Marathi/ आयुष्य मेसेज मराठी
Life message in marathi |
भावना बुध्दीपेक्षा अधिक हट्टी असते.
युगायुगांचे संस्कार तिच्या
कणाकणात भिनलेले असतात.
_____________________________________
भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात;
त्याची खपली काढू नये.
_____________________________________
भय म्हणजे मनुष्याचे अंत:करण,
त्याला त्याच्या अपराधाबद्दल
देत असलेला कर आहे…
_____________________________________
भक्ती हे सोंग नाही,
मन सुधारण्याचा तो
एक मार्ग आहे…
_____________________________________
बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही
विचार
स्वीकारू नका…
_____________________________________
फुलपाखरु फक्त 14 दिवस जगतं,
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगुन कित्येक हदय जिकंत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि
प्रत्येक हदय जिकंत रहा
_____________________________________
प्रेम एक आदर्श गोष्ट आहे,
लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे.
_____________________________________
प्रेम आहे,
जेथे जीवन आहे.
_____________________________________
प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती
असावीच…
Gud Nyt नंतर
Luv u बोलणारी……
_____________________________________
प्रत्यक्षात ‘स्वार’ बदलला तरी घोड्याच्या टापांखाली चिरडले
जाणारे तेच असतात…
_____________________________________
पुस्तकाची पाने पलटताना एक
विचार मनात येतो आयुष्याची पाने
अशीच पलटली तर “क्या बात है” …!!!
_____________________________________
पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक
महत्वाचे असतात…
_____________________________________
परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर
अडचणींना हे सांगा की तुमचा
परमेश्वर किती मोठा आहे…
_____________________________________
पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त नाती
पण आहेत ती मनापासून जपतो…
आपल्या माणसांवर मात्र
मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो..
_____________________________________
नोकरी म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे…….कारण
चिखलात जोरात चालता येत नाही आणि दमलो म्हणून बसता येत नाही…..🎭
_____________________________________
नेहमी तत्पर रहा;
बेसावध आयुष्य जगू नका.
_____________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा. तुम्ही तुमच्या whatsapp वरही share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.
🙏…धन्यवाद…🙏